esakal | ...अन् त्या बापाला मुलीचं लग्न बघण्याचंही मिळालं नाही सुख; भरदिवसा घडला अंगावर शहरे आणणारा थरार
sakal

बोलून बातमी शोधा

crime

...अन् त्या बापाला मुलीचं लग्न बघण्याचंही मिळालं नाही सुख; भरदिवसा घडला थरार

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

चांदुर रेल्वे (जि. अमरावती) : कोरोना सारख्या महामारीमुळे आधीच अनेक नागरिकांना काम किंवा नोकरी गमवावी लागला आहे, त्यामुळे अनेक लोकांच्या हातचे काम गेले. त्यात लागलेल्या संचारबंदीमुळे अनेक लोक घरी बसून आहेत. अशातच घरी बसून असल्यामुळे चांदुर रेल्वे शहरातील खडकपुरा येथील घराशेजारी राहणाऱ्या दोन जणांमध्ये केबल सारख्या क्षुल्लक कारणावरून वाद होऊन खडकपुरा येथील सुखदेव मारोतराव लुटे (वय 45) यांचा खून करण्यात आला.

हेही वाचा: "मामा, अपने को कूछ नही होता बे"; हा Attutide ठेवा खिशात: एका कोरोनाग्रस्ताचं भावनिक पत्र

सविस्तर असे की, चांदुररेल्वे शहरातील खडकपुरा येथे सुखदेव लुटे व राजेश गोविंदराव मोहतुरे हे एकमेकाच्या घराशेजारी राहतात. त्यांच्यात अनेक दिवसांपासून क्षुल्लक कारणावरून वाद होत होता. अशातच माझ्या घरासमोरून केबल का टाकला असा वाद उद्भवला, त्या वादाचे भांडणात रूपांतर झाले.

राजेश गोविंदराव मोहतुरे त्यांनी लोखंडी सळाखीने सुखदेव मारोतराव लुटे यांच्यावर वार केले. खून झाल्याची माहिती नागरिकांनी तत्काळ चांदुर रेल्वे पोलिस स्टेशनला दिली. ठाणेदार मगन मेहते यांनी घटनास्थळी धाव घेऊन तत्काळ संशयित आरोपीस अटक केली व 302 कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. त्याला आजच न्यायालयासमोर हजर केले असता संशयित आरोपीस पीसीआर देण्यात आला.

हेही वाचा: नागपूर पोलिस इन ॲक्शन मोड: रस्त्यावर हुंदडणाऱ्यांची चौकशी; दिवसभरात ६४० वाहने जप्त

खडकपुरा येथील अनेक दिवसांपासून मयत सुखदेवराव लुटे हे राहत होते. त्यांना पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहेत. नवमीच्या दिवशी त्यांच्या मुलीचा लग्न सोहळा सुद्धा आयोजित केला आहे. त्यांच्या मुलीच्या लग्न पत्रिका वाटण्याचा कार्यक्रम सुरू होता. हातमजुरी करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या खुनाची बातमी नागरिकांना कळताच अनेक लोकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार मगन मेहते करीत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ