Police Action : टाकळघाट येथे किराणा दुकानातून अंडी घेतल्यावरून झालेल्या वादातून एका इसमाच्या डोक्यावर तलवारीने वार करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
टाकळघाट : किराणा दुकानातून अंडी घेऊन जाताना दोन इसमांमध्ये वाद झाला. तो विकोपाला जाऊन आरोपीने आपल्या हातातील तलवारीने एकाच्या डोक्यावर वार केले. यात तो गंभीर जखमी झाला. ही घटना टाकळघाट येथे घडली.