esakal | तुटपुंजा पगार अन् आजाराला कंटाळून तरुणाची आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

सुरजसिंह राजूसिंह दीक्षित

तुटपुंजा पगार अन् आजाराला कंटाळून तरुणाची आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तिवसा (अमरावती) : जिल्ह्यातील तिवसा (teosa amravati) येथील २१ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तुटपुंजा पगार आणि आजाराला कंटाळून आत्महत्याचे केल्याचे सांगितले जात आहे. डेहनी शेतशिवारात ही शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली.

हेही वाचा: २५ वर्षीय तरुणाचा विधवेवर बलात्कार, एकटी राहत असल्याचा गैरफायदा

सुरजसिंह राजूसिंह दीक्षित, असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी घरून देवीच्या दर्शनासाठी जात असल्याचे सांगून सूरज निघून गेला. मात्र, रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने घरच्यां लोकांनी शोध घेतला असता कुठेही दिसला नाही. त्यामुळे शनिवारी 9 ऑक्टोबर रोजी बेपत्ता असल्याची माहिती तिवसा पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. सूरजचा शोध घेतला असता डेहनी शेतशिवारात झाडाला मृतदेह लटकून असल्याची माहिती एका शेतकऱ्याने नातेवाईकांना दिली. यावेळी कुटुंबीयांनी घटनास्थळाकडे धाव घेतली असता दुपट्ट्याने गळफास घेऊ आत्महत्या केल्याचे आढळून आले. पोलिसांना माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचनामा करत मर्ग दाखल करण्यात आला.

सूरज हा एमआयडीसी येथील एका खासगी कंपनीन काम करून घरचा उदरनिर्वाह चालवित होता. तुटपुंजा पगार, आर्थिक विवंचना आणि डोक्याच्या आजारला कंटाळून त्याने हे टोकाचे पाऊल उचल्याचे बोलले जात आहे.

loading image
go to top