कालव्यात पडून तरुणाचा मृत्यू; तब्बल चार दिवसांनंतर मृतदेह लागला हाती

Man died due to drowning in canal in yavatmal
Man died due to drowning in canal in yavatmal

फुलसावंगी (जि. यवतमाळ) : पोटाची खळगी भरण्यासाठी कुटुंबासह औरंगाबाद येथे जात असलेल्या तरुणाचा तोल गेल्याने कालव्यात पडून मृत्यू झाला. चार दिवस शोध घेतल्यावर त्याचा मृतदेह हाती लागला.

ज्ञानेश्वर डोके (35, रा. नारळी) असे मृताचे नाव आहे. तो वाहन चालवून कुटुंबाचा गाडा ओढत होता. कोरोनामुळे कामबंद असल्याने सोमवारी (ता. आठ) कुटुंबासह औरंगाबाद येथे जाण्यासाठी निघाला.

औंढा नागनाथपासून गोळेगाव रोडवर असलेल्या एका ढाब्यावर जेवण आटोपले. शौचासाठी पानटपरीच्या मागे गेला असता, मोठ्या कालव्यात 25 फूट खाली कोसळला आणि पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला. चार दिवस शोधमोहीम राबविल्यावर गुरुवारी (ता.11) बार्शी टाकळी शिवारात मृतदेह मिळून आला. 

घटनास्थळीच शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. ज्ञानेश्‍वरच्या पश्‍चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, लहान भाऊ असा आप्तपरिवार आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.


संपादन - अथर्व महांकाळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com