
लाखांदूर : पत्नीचे एका अविवाहित मुलाशी अनैतिक संबंध होते. या अनैतिक संबंधातून संतापलेल्या पतीने पत्नीपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. याची कल्पना पोलिस स्टेशनला ही दिली. मात्र या घटनेचा वचपा काढण्यासाठी त्याने मुलाचे घर गाठले व त्याच्या आईच्या डोक्यावर लाकडी काठीने मारून खून केल्याची घटना उघडकीस आली.