मंगरूपीर : तालुक्यातील पिंप्री खरबी गावातील एका व्यक्तीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या करून स्वतः गळफास घेऊन जीवन संपवले आहे. ही घटना गुरुवारी( ता. १० ) उघडकीस आली. .ज्योती गौतम वर असे (वय ४५) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर गौतम नारायण वर असे आत्महत्या केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. गौतम वर आणि ज्योती वर हे मंगरुळपीर तालुक्यातील धोत्रा नजीक असलेल्या पिंप्री खरबी गावात वास्तव्याला आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. .मुलीचे लग्न झाले आहे, तर मुलगा नोकरीनिमित्त बाहेरगावी असतो. आरोपी गौतम याने आधी धारदार विळ्याने पत्नीवर वार केले. यानंतर लोखंडी टॉमीने घाव घालत पत्नीची हत्या केली आहे. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने गळफास घेऊन स्वत:ही आत्महत्या केली आहे..Pangolin Smuggling : खवले मांजराची अवैध तस्करी; वन विभागाकडून सहा जणांवर कारवाई.रात्री घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या दुहेरी मृत्यूमुळे दोन्ही मुले अनाथ झाली आहेत. या घटनेची दखल पोलिसांनी घेतली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.