
मांढळ गावातील पीडित मुलगी आणि आरोपी, वय वर्ष ३१, हे शेजारी शेजारी राहतात. घटनेच्या दिवशी पीडीत मुलगी घराशेजारी सुरु असलेल्या हवन कार्यक्रमासाठी गेली होती. त्यानंतर प्रसादासाठी भावाला घेवून येते म्हणून घरी परत आली.
मोहाडी (जि. भंडारा) : चॉकलेट खाऊ देण्याच्या बहाण्याने निर्जन स्थळी नेऊन एका ४ वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग केल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास मोहाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तुमसर तालुक्यातील मांढळ येथे घडली . बलात्कार करणाऱ्या नराधमाला मोहाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लक्ष्मीकांत सेलोकर रा. मांढळ असे आरोपीचे नाव आहे.
मांढळ गावातील पीडित मुलगी आणि आरोपी, वय वर्ष ३१, हे शेजारी शेजारी राहतात. घटनेच्या दिवशी पीडीत मुलगी घराशेजारी सुरु असलेल्या हवन कार्यक्रमासाठी गेली होती. त्यानंतर प्रसादासाठी भावाला घेवून येते म्हणून घरी परत आली.
भाऊ झोपलेला असल्याने आईने तिला 'तू प्रसाद घेवून ये ' असे सांगितले. मुलगी पुन्हा प्रसाद घेण्याकरिता शेजारच्या घरी गेली. बराच वेळ ती परत न आल्याने आईने शोध सुरू केला. काही वेळानंतर मुलगी शेजारच्या युवकासोबत घराकडे येताना दिसली. ती रडत असल्याने आईने तिला विचारणा केली.
तिने आरोपी लक्ष्मीकांत उर्फ छोटू सीताराम सेलोकर याने चॉकलेट देतो असे म्हणून त्याने तिला जवळच बांधकाम सुरु असलेल्या एका घरी नेवून तिच्यावर अतिप्रसंग केल्याचे तिने आईला सांगितले. या संपूर्ण प्रकारामुळे कुटुंबीय हादरले आणि त्यांनी थेट पोलिस स्टेशन गाठले.
क्लिक करा - पवित्र नात्याला काळिमा! सासऱ्याने केला सुनेवर अत्याचार; नातवाला जीवे मारण्याची दिली धमकी
या प्रकरणाची तक्रार मोहाडी पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली असून आरोपी विरुद्ध ३७६,ए,बी, भांदवि, सहकलम ४,६,८, बाललैन्गिक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. तपास पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे, पोलिस नायक मिथुन चांदेवार करीत आहेत.
संपादन - अथर्व महांकाळ