पैशाचा पाऊस पाडण्यावरून युवतीशी अघोरी कृत्य; दोन आरोपींना अटक; भोंदूबाबा फरार 

टीम ई सकाळ  
Wednesday, 7 April 2021

पीडित मुलगी शिक्षणासाठी वर्ध्यात राहत होती. या मुलीला सोबत घेत तिची आई, काका आणि अन्याय एक आरोपी पैशाचा पाऊस पाडण्याचे कारण सांगून हिंगणघाट तालुक्यातील येरणगाव येथे नेत होते. या प्रकाराला कंटाळून मुलगी घर सोडून पळाली होती.

वर्धा : कुमारिका मुलीला सोबत नेत भोंदूबाबाच्या मदतीने पैशाचा पाऊस पडण्याचा अघोरी प्रकार वर्ध्यात घडला. या प्रकरणी रामनगर पोलिस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलीच्या काकासह अन्य एकाला अटक करण्यात आली आहे.

पीडित मुलगी शिक्षणासाठी वर्ध्यात राहत होती. या मुलीला सोबत घेत तिची आई, काका आणि अन्याय एक आरोपी पैशाचा पाऊस पाडण्याचे कारण सांगून हिंगणघाट तालुक्यातील येरणगाव येथे नेत होते. या प्रकाराला कंटाळून मुलगी घर सोडून पळाली होती.

बाप रे बाप! साडे आठ तोळे सोनं आणि अर्धा किलो चांदी लंपास; तब्बल 3 लाख 62 हजारांची घरफोडी

पोलिसांनी या मुलीचा शोध घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यावरून पोलिसांनी अंधश्रद्धा प्रातिबंधात्मक कायद्याअंतर्गत आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करून मुलीच्या काकासह प्रवीण नामक व्यक्तीला अटक केली. 

यातील मुख्य आरोपी असलेल्या भोंदूबाबाच्या शोधात पोलिस पथक रवाना झाल्याची माहिती रामनगर पोलिसांनी दिली. पैशाच्या कामाकरिता मांत्रिक आणि इतर दोघांनी या मुलीला अनेक ठिकाणी नेल्याची माहिती तिने पोलिस प्रशासनाला दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man misbehaving with girl on the name of superstitions