जळगाव ग. स. सोसायटीच्या अध्यक्षपदी मनोज पाटील, उपाध्यक्ष श्‍यामकांत भदाणे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मे 2019

जळगाव जिल्हा सरकारी नोकरांच्या सहकारी (ग. स.) सोसायटीत गुप्त मतदान पध्दतीने निवडणूक होवून अध्यक्षपदी मनोज पाटील तर उपाध्यक्षपदी श्‍यामकांत भदाणे विजयी झाले. 

जळगाव : जिल्ह्यात तब्बल 35 हजार शासकीय नोकरदार सभासद असलेल्या जळगाव जिल्हा सरकारी नोकरांच्या सहकारी (ग. स.) सोसायटीच्या अध्यक्षपदाच्या आज झालेल्या निवडणूकीत एकतर्फी सर्व 21 सदस्य निवडून आलेल्या सहकार गटातच फुट पडली. त्यामुळे गुप्त मतदान पध्दतीने निवडणूक होवून अध्यक्षपदी मनोज पाटील तर उपाध्यक्षपदी श्‍यामकांत भदाणे विजयी झाले. 

जळगाव जिल्हा सहकारी नोकराच्या सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपद निवडीसाठी आज संस्थेच्या बळीराम पेठेतील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सकाळी अकरा वाजता सभा आयोजित करण्यात आली होती. 
सभेच्या पिठासीन अध्यक्षपदी सहाय्यक निंबंधक के.टी.पाटील होते. सहकार गटाचे एकतर्फी 21 सदस्य आहेत. तसेच गेल्या चार वर्षापासून निवड बिनविरोध होत असल्यामुळे यावेळी ही निवड बिनविरोध होण्याची शक्‍यता व्यक्त होत होती. अध्यक्षपदासाठी उदय पाटील यांचे नाव होते. मात्र या पदासाठी याच गटाचे मनोज पाटील यांनीही अर्ज दाखल केला. तर उपाध्यक्षपदासाठी ज्ञानेश्‍वर सोनवणे यांचे नाव होते. मात्र श्‍यामकांत भदाणे यांनीही अर्ज दाखल केला. त्यामुळे सहकार गटात फुट पडल्याचे निश्‍चित झाले होते. अध्यक्षपदाच्या निवडीत मनोज पाटील 11 मते पडली तर उदय पाटील यांना 9 मते पडली. उपाध्यक्षपदाच्या निवडीत श्‍यामकांत भदाने यांना 12 मते पडली तर ज्ञानेश्‍वर सोनवणे यांना 8 मते पडली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manoj Patil Appointed as a g s society president and shyamkant bhadane as a vice president