

Washim
esakal
मानोरा: मंगरूळपीर–मानोरा राष्ट्रीय महामार्गावरील मानोरा शहरातील सृष्टी गार्डनजवळ बुधवारी (ता. १५) पहाटे ३ ते ३.३० वाजण्याच्या सुमारास भरधाव कारने रस्ता दुभाजकाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील तिघे जखमी झाले असून चालक गंभीर जखमी आहे. जखमींवर दिग्रस येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.