

Washim
esakal
मानोरा: राज्यात सर्वात मागास असलेल्या तालुक्यात अजूनही प्रशासकीय अनास्थेने ठाण मांडल्याचे चित्र आहे. तालुक्यातील गलमगाव धानोरा ते सोयजना, पंचाळा रस्ता अक्षरशः खड्डेमय झाला असून वाहनचालकांचा प्रत्येक प्रवास जीव मुठीत धरूनच सुरू आहे.सदर रस्ता अतिशय खराब झाला असून ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्यांमुळे आतापर्यंत अनेक किरकोळ व गंभीर अपघात घडले आहेत. तरीही संबंधित प्रशासनाकडून दुरुस्तीकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.