esakal | गडचिरोलीतील अनेक भाग जलमय
sakal

बोलून बातमी शोधा

गडचिरोली : पुराच्या पाण्यामुळे खरपुंडी मार्गावर तीन ते चार फूट पाणी साचले होते.

गडचिरोलीतील अनेक भाग जलमय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : शहरात सोमवारी (ता.2) पहाटे पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असून अनेक वस्त्या जलमय झाल्या. त्यामुळे नागरिकांना सकाळी घराबाहेरही पडता आले नाही. अयोध्यानगर, राधे बिल्डिंग परिसर, कन्नमवार नगर, विवेकानंद नगर, गोकुळनगर तसेच चंद्रपूर मार्गावरील आयटीआय चौक भागातील शेकडो घरांना मुसळधार पावसाचा फटका बसला असून खरपुंडी व विसापूर या दोन महामार्गावर पुरामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापासून सुरू झालेला पाऊस थांबण्याचे चिन्ह दिसत नाही, कधी दिवसा तर कधी रात्री बरसणाऱ्या पावसाने नागरिक त्रस्त असून शेतीची कामेही रेंगळली आहेत. जिल्ह्यात दमदार पावसामुळे रोवणीचे काम जोमात आटोपले. मात्र सतत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतातील बांध्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने धान पऱ्ह्यांना धोका निर्माण झाला आहे. सोमवारी पहाटेपासून पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाल्याने गडचिरोली शहरात अनेक भागात पुराचे पाणी साचल्याचे बघायला मिळाले.
गडचिरोली येथील नगर परिषदेच्या आवारात दोन ते तीन फूट पावसाचे पाणी साचले होते. खरपुंडी रस्त्यावर कठाणी नदीच्या पुराचे पाणी आल्याने या मार्गाची वाहतूक सकाळी दहा वाजेपर्यंत बंद होती.

नुकसान भरपाईची प्रतीक्षा
शहरातील काही वसाहतींमध्ये यंदा मुसळधार पावसामुळे अनेकदा पाणी साचल्याने शेकडो नागरिकांचे नुकसान झाले. विवेकानंद नगर, अयोध्यानगर, गोकुळनगर भागात पावसाचा सर्वाधिक फटका बसला. अनेक घरांची पडझड
झाली; परंतु प्रशासनाकडून आजवर मदतकार्य केले नाही.

loading image
go to top