Gadchiroli News : गडचिरोली- नारायणपूर पोलिसांतर्फे माओवाद्यांचा शस्त्रास्त्र कारखाना उद्ध्वस्त

शरणागती पत्करलेल्या माओवाद्यांच्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आंतरराज्यीय सीमावर्ती भागात 'ऑपरेशन अंतिम प्रहार' अंतर्गत मोठी कारवाई केली.
gadchiroli Maoist Arms Factory Dismantled

gadchiroli Maoist Arms Factory Dismantled

sakal

Updated on

गडचिरोली - शरणागती पत्करलेल्या माओवाद्यांच्या गोपनीय माहितीच्या आधारे गडचिरोली व छत्तीसगडच्या नारायणपूर पोलिसांनी आंतरराज्यीय सीमावर्ती भागात 'ऑपरेशन अंतिम प्रहार' अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेत माओवाद्यांचा दुर्गम जंगलातील शस्त्रास्त्र निर्मिती कारखाना पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आला आहे. २३ मे २०२६ नंतर २७ मे २०२६ रोजी पुन्हा एकदा प्रभावी कारवाई करत माओवाद्यांनी जंगलामध्ये जमिनीत लपवून ठेवलेले साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलिस दलास यश आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com