
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळ नव्याने स्थापन करण्यात आलेल्या कवंडे पोलिस स्टेशनजवळ माओवाद्यांच्या भामरागड दलमने घातपात करण्याच्या उद्देशाने तळ उभारल्याची विश्वसनीय माहिती गडचिरोली पोलिसांना प्राप्त झाली. गडचिरोली पोलिसांनी वेगवान कारवाई करत माओवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला.