
गडचिरोली : अतिदुर्गम दिरंगी आणि फुलनार गावाच्या जंगल परिसरात असलेला माओवाद्यांचा तळ उद्ध्वस्त करण्यात गडचिरोली पोलिसांना मंगळवारी (ता. ११) यश मिळाले. मात्र, यावेळी झालेल्या चकमकीत पोलिस अंमलदार महेश कवडू नागुलवार हा सी-६० पथकाचा जवान गोळी लागून हुतात्मा झाला.