Manoj Jarange: मराठा आरक्षणासाठी विदर्भातील लाखो कार्यकर्ते मुंबईतील मोर्चात सहभागी होणार; ठोक आंदोलनाची तयारी
Maratha Reservation: मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे, अशी मागणी घेऊन २९ ऑगस्टला विदर्भातील कार्यकर्ते मुंबईत मोर्चासाठी रवाना होणार आहेत. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात मुलांसाठी वसतिगृह बांधण्याची मागणीही मोर्चाद्वारे केली जाईल.
नागपूर : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी लाखावर मराठे विदर्भातून २९ ऑगस्टला मुंबईतील मोर्चासाठी रवाना होणार आहेत, अशी माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक उमेश घाडगे यांनी पत्रकातून दिली आहे.