बलात्कारातील आरोपीला मटण पार्टीची शिक्षा देणाऱ्या पंचांना अटक

संजय तुमराम
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

धानोरा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला मटण पार्टीचा दंड जात पंचायतीन ठोठावला होता. गडचिरोली जिल्ह्यातील मोहर्लीच्या घटनेने सर्वांना धक्का बसला होता. बलिकेवरील अत्याचाराचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असून,, जात पंचायतीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भुमकाल संघटनेने केली होती.

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील मोहर्ली येथे बलात्काराच्या प्रकरणात मटण पार्टीचा दंड देणाऱया जात पंचायतीच्या सहा पंचांना अटक करण्यात आली असून, अटक केलेल्यांवर अल्पवयीन मुलीवर बलात्काराचे प्रकरण दडपण्यात मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

धानोरा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला मटण पार्टीचा दंड जात पंचायतीन ठोठावला होता. गडचिरोली जिल्ह्यातील मोहर्लीच्या घटनेने सर्वांना धक्का बसला होता. बलिकेवरील अत्याचाराचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असून, जात पंचायतीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भुमकाल संघटनेने केली होती. ग्रामस्थांनी मटण पार्टी झोडून पिडीतेकडे दुर्लक्ष केले होते. पाचवीतील पीडित मुलीच्या अत्याचाराचा आरोपी मोकाट आहेत.  

धानोरा तालुक्यातील मोहली या गावी शाळा शिकणाऱ्या मुलीला घरी सोडून देतो असा बहाणा करत एका व्यक्तीने नेले. मात्र वाटेत एका तलावाजवळ त्याच्यावर अत्याचार केला. घरी गेल्यावर घटना उघडकीस येताच पीडितेच्या आईवडिलांनी पोलिसांकडे न जाता जात-पंचायत बोलावली. या पंचायतीत गावाचे सर्व मान्यवर सहभागी झाले. यात आरोपीने गावाला पार्टी द्यावी आणि उपचारासाठी १२ हजार द्यावे असा तोडगा निघाला. इकडे उपचाराविना मुलीची प्रकृती बिघडली आणि १२ हजार रुपये देखील पोचले नाहीत. पुन्हा जात पंचायत भरली आणि त्यांनी पीडितेच्या आईवडिलांना पोलिसात जाण्याचा सल्ला दिला. तब्बल ७ दिवसांनी प्रकरण पोलिसात गेले पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. घटनेची माहिती मिळताच भुमकाल नामक संघटनेने या गावला भेट देत माहिती घेतली यात पीडितेवर अन्याय करणाऱ्या सर्व दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. अखेर जात पंचायतीतील पाच सदस्यांना अटक करण्यात आली असून, आरोपीलाही ताब्यात घेण्यात आले आहे.

Web Title: Marathi news Vidarbha news rape case in Gadchiroli