
-अविनाश साबापुरे
यवतमाळ : सीमाप्रश्नावरून एकमेकांशी तणाव असलेले कर्नाटक आणि महाराष्ट्र आता शालेय अभ्यासक्रमात हातात हात घालून पुढे जाणार आहेत. होय, महाराष्ट्रातील गुरुजींनी लिहिलेली ‘खरा देव’ ही मराठी कथा कर्नाटकात कन्नड शाळांमध्ये मराठीतच शिकविली जाणार आहे.