esakal | यंदा विदर्भाच्या काशीत भरणार नाही यात्रा, कोरोनामुळे भाविकांसाठी दर्शन बंद
sakal

बोलून बातमी शोधा

markandeo yatra cancelled due to corona in chamorshi of amravati

ट्रस्टचे अध्यक्ष भांडेकर म्हणाले की, मार्कंडादेव येथील मंदिर 10 ते 20 मार्च 2021 पर्यंत भाविकांसाठी पूर्णत: बंद राहणार आहे. 7 मार्च रोजी गंगापूजन व 11 मार्च रोजी आरंभी महापूजा धार्मिक परंपरेनुसार पहाटे साडेचार वाजता होणार आहे.

यंदा विदर्भाच्या काशीत भरणार नाही यात्रा, कोरोनामुळे भाविकांसाठी दर्शन बंद

sakal_logo
By
अमित साखरे

चामोर्शी (जि. अमरावती) : विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या मार्कंडादेव येथे दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त भरणारी यात्रा यावर्षी भरणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाद्वारे कोविड अधिनियमाअंतर्गत यावर्षी ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. मात्र, महाशिवरात्री यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही विधिवत पूजा होणार आहे, अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्यूंजय गायकवाड यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. 

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याचा ‘ट्रेंड’; आता...

ट्रस्टचे अध्यक्ष भांडेकर म्हणाले की, मार्कंडादेव येथील मंदिर 10 ते 20 मार्च 2021 पर्यंत भाविकांसाठी पूर्णत: बंद राहणार आहे. 7 मार्च रोजी गंगापूजन व 11 मार्च रोजी आरंभी महापूजा धार्मिक परंपरेनुसार पहाटे साडेचार वाजता होणार आहे. 12 मार्च रोजी टीपुर पूजा देवस्थानावरील कळसावर दिवा लावून व्याहाड येथील मारुती पाटील म्हशाखेत्री यांच्या कुटुंबीयांकडून केली जाणार आहे. 14 मार्च रोजी सकाळी 10:30 वाजता समारोपीय महापूजा होणार आहे. तरी कोवीड 19 च्या शासनाच्या अटी व शर्तीचे पालन करून विदर्भाची काशी मार्कंडादेव येथे 10 मार्च ते 20 मार्चपर्यंत रूढी परंपरेनुसार धार्मिक महापूजा सकाळी व सायंकाळी करण्यात येईल. नागरिकांनी व भाविकांनी मंदिर पूर्णतः बंद असल्याने या कालावधीत श्री क्षेत्र मार्कंडादेव येथे येऊ नये, असे आयोजित पत्रकार परिषदेला माहिती देताना श्री मार्कंडेश्‍वर देवस्थान समितीचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्यूंजय गायकवाड यांनी दिली. 

हेही वाचा -रोजगार हमी म्हणजे ‘अर्धे तुम्ही, अर्धे आम्ही’;...

दरम्यान, यावर्षी गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या आदेशानुसार चामोर्शीच्या तहसीलदारांनी मार्कंर्डादेव, चपराळा येथील महाशिवरात्री यात्रा रद्द करण्याचा आदेश जारी केला आहे. तसेच मार्कंर्डादेव, चपराळा येथील मंदिरे 10 ते 20 मार्चपर्यंत भाविकांसाठी बंद राहणार असल्याचे परिपत्रकाद्वारे सांगितले आहे. विदर्भाची काशी असणाऱ्या मार्कंडादेव येथे दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरत असते. विदर्भाच्या कानाकोपऱ्यातील भाविकांसह इतर राज्यांतील भाविक मोठ्या संख्येने येत असतात. तसेच आष्टी-अहेरी मार्गावरील चपराळा येते महाशिवरात्री यात्रेस भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात. त्यामुळे तालुका प्रशासनाच्यावतीने दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रेचे नियोजन केले जाते. मात्र, यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास प्रारंभ झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्ह्यातील यात्रेला परवानगी दिली जाणार नाही हे यापूर्वी जाहीर केले होते. त्यानुसार चामोर्शीचे तहसीलदार जितेंद्र शिकतोडे यांनी साथरोग अधिनियमांतर्गत चपराळा व मार्कंडादेव येथील यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत मार्कंडादेव व चपराळा येथील हनुमान मंदिर प्रशांत धाम मंदिर 10 ते 20 मार्च पर्यंत रूढीपरंपरेनुसार पूजा सुरू ठेवून नागरिक तसेच भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा -

महाशिवरात्रीही साध्या स्वरूपात -
गडचिरोली जिल्ह्यात श्रीक्षेत्र मार्कंडादेव, चपराळा येथील प्रशांतधाम मंदिर, सिरोंचा तालुक्‍याच्या सीमेवरील कालेश्‍वर मंदिर, कुरखेडा तालुक्‍यातील खोब्रामेंढा, अरतोंडी, आरमोरी येथील भंडारेश्‍वर, धानोरा तालुक्‍यातील भवरागड, टिपागड, अहेरी तालुक्‍यातील व्यंकटापूर, अशा अनेक महत्त्वाच्या देवस्थानांत भव्य स्वरूपात महाशिवरात्रीची यात्रा भरत असते. पण, यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर महाशिवरात्रीचा सण साध्या स्वरूपातच साजरा करण्यात येणार आहे.