दोनशे पाहुण्याचा केला स्वयंपाक आणि आचाऱ्याचाच झाला पाहुणचार

अभिजीत घोरमारे
मंगळवार, 24 मार्च 2020

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्‍यातील घाटटेमणी या गावात लग्नाप्रित्यर्थ स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी तब्बल 200 नातेवाईकांच्या जेवणाची तयारी सुरु असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाला मिळाली. पोलिस घटनास्थळी गेले आणि त्यांनी त्यांच्या स्टाईलने संबंधितांना दम देखील दिला. तिथे स्वयंपाक करणाऱ्या आचाऱ्याला तर पोलिसांचा चोपही मिळाला.

गोंदिया : राज्यात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता जमावबंदी आणि संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. तसेच सगळे सामाजिक कार्यक्रम, विवाह समारंभ तसेच स्वागत समारंभ रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांनीही तसेच आदेश जारी केले आहेत. मात्र ग्रामीण भागात याची पायमल्ली होत आहे. अजूनही नागरिकांना या आजाराचे गांभीर्य लक्षात येत नाही. हे दुर्दैव आहे. प्रशासन आणि पोलिसांच्या वतीने तसेच माध्यमांमधून सतत याविषयीची जागृती सुरू आहे, तरीही लोकांनी आपले कार्यक्रम, समारंभ सुरूच ठेवले आहेत.

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्‍यातील घाटटेमणी या गावात लग्नाप्रित्यर्थ स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी तब्बल 200 नातेवाईकांच्या जेवणाची तयारी सुरु असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाला मिळाली. पोलिस घटनास्थळी गेले आणि त्यांनी त्यांच्या स्टाईलने संबंधितांना दम देखील दिला. तिथे स्वयंपाक करणाऱ्या आचाऱ्याला तर पोलिसांचा चोपही मिळाला.

सविस्तर वाचा - त्या अठ्ठावीस प्रवाशांची गाडी सुटली आणि मग! वाचा यांची संवेदनशीलता

जिल्हा प्रशासन नागरिकांना मोठ्या संख्येने एकत्रित येण्याकरिता मज्जाव करीत असले तरी असे प्रकार ग्रामीण भागात सर्रास सुरु आहेत. तर घडलेल्या प्रसंगी आयोजकाविरुद्ध कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून , यापुढे अशा समारंभास मज्जाव करण्यात आला आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marriage reception in curfew time