Domestic Violence : २० वर्षीय विवाहितेचा मानसिक-शारीरिक छळ; तेल्हार येथे गुन्हा दाखल
Telhara News : तेल्हार येथे सासरी शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याची तक्रार २० वर्षीय विवाहितेने केली आहे. पैशासाठी वडिलांकडून आणण्यासाठी दबाव आणल्याप्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तेल्हार : गत सव्वा वर्षापूर्वी विवाहबद्ध झालेल्या २० वर्षीय विवाहितेचा वडिलांकडून पैसे आणण्यासाठी, सासरी शारीरिक मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध तेल्हारा पोस्टेमध्ये गुरुवारी (ता.५) गुन्हा दाखल करण्यात आला.