पती नपुंसक, म्हणून नंदोयासह सहा जणांची तिच्यावर पडली वाईट नजर अन्...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 April 2020

महिलांचा छळ होत असल्याच्या घटना वेळोवेळी घडत आहे. यातच आता बाळापूर तालुक्यातील उरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका गावात धक्कादायक अशी घटना समोर आली आहे.

बाळापूर (जि.अकोला) : महिलांचा छळ होत असल्याच्या घटना वेळोवेळी घडत आहे. यातच आता बाळापूर तालुक्यातील उरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका गावात धक्कादायक अशी घटना समोर आली आहे. तर आपली बदनामी होऊ नये म्हणून सासरच्या मंडळींनी तीला घरातच कोंडून ठेवले असल्याची माहिती समोर आली आहे.

सासरच्या मंडळींनी पती नपुंसक असल्याचे लपवून ठेवत दोन वर्षांपासून विवाहितेला घरातच कोंडून ठेवून छळ केल्याची आल्याची धक्कादायक घटना बाळापूर तालुक्यातील उरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका गावात शनिवारी (ता.25) उघडकीस आली. या प्रकरणी माहेरच्या मंडळींनी उरळ पोलिस ठाणे गाठत सहा जणांविरुद्ध तक्रार दिली आहे. यासंदर्भात रात्री उशीरा कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू होती.

आवश्‍यक वाचा - Video : अक्षय्य तृतीयेला चिंचोणीला हे विशेष महत्त्व...वाचा

याबाबत सविस्तर वृत्त असे की, चान्नी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका गावातील युवतीचा विवाह दोन वर्षांपूर्वी रितीरिवाजानुसार बाळापूर तालुक्यातील एका गावात झाला होता. सासरी गेल्यानंतर काही दिवसांनीच तीचा छळ सुरू झाला. त्याच गावात विवाहितेची नणंद व तीचा नवरा वास्तव्यास आहे. त्याने दोन वर्षांच्या काळात आपल्यावर अनेकदा शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप विवाहीतेने केला आहे. विवाहितेचा पती हा नपुंसक असल्याची माहिती सासरच्या मंडळीने लपवून ठेवली. लग्नानंतर ही बाब उघड झाली. 

हेही वाचा - नशेसाठी सॅनिटायझरचा एक घोट ठरू शकतो घातक

आपली बदनामी होऊ नये म्हणून सासरच्या मंडळींनी तीला घरातच कोंडून ठेवले होते. याबाबत तीने आपल्या माहेरी फोन करून सांगितले. मात्र, आज ना उद्या सगळे सुरळीत होईल या उद्देशाने माहेरकडील मंडळी गप्प बसली होती. याचाच फायदा घेत नणंदेच्या पतीचा अत्याचारही वाढल्याची सूत्रांची माहिती आहे. अखेर शनिवारी (ता.25) सकाळी विवाहीतेने माहेरकडील मंडळीला बोलावून घेत उरळ ठाणे गाठत तक्रार दिली. रात्री उशीरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती.

चौकशी अंती गुन्हा दाखल
या प्रकरणात विवाहितेने आमच्याकडे तक्रार दिली आहे. यासंदर्भात चौकशी अंती गुन्हा दाखल करण्यात येईल.
-विलास पाटील, ठाणेदार, उरळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: married woman being locked up at home for two years and tortured in akola