
लाखांदूर : मध्यरात्रीच्या सुमारास घरातील सदस्य गाढ झोपेत असल्याचे पाहून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी रात्री १ . ३० वाजता तालुक्यातील भागडी गावात घडली. या घटनेत मयूरी सुनील बोरकर (३१) रा. भागडी या विवाहितेचा मृत्यू झाला आहे.