चप्पल विहिरीतील पाण्यावर दिसली तरंगताना, मग आले हे सत्य समोर...

well.jpg
well.jpg

मोताळा (जि.बुलडाणा) : नांदुरा तालुक्यातील तांदूळवाडी येथील दुर्गा विजय बोरकर (24) या विवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.22) पहाटे पाच वाजताच्या सुमारास तांदूळवाडी शिवारात उघडकीस आली.

नांदुरा तालुक्यातील तांदूळवाडी येथील विजय भगवान बोरकर (वय 30) यांनी बोराखेडी पोलिसांत फिर्याद दिली की, त्यांची पत्नी दुर्गा विजय बोरकर (वय 24) ही रविवारी पहाटे शौचास जाते असे सांगून घरून निघून गेली. परंतु बराच वेळ झाला तरी ती घरी परत आली नाही. तिचा परिसरात शोध घेतला असता, तांदूळवाडी शिवारातील श्रीकांत सुपे यांच्या विहिरीजवळ प्रातविधीचा डबा पडलेला दिसून आला. विहिरीजवळ जाऊन पाहिले असता, विवाहितेची चप्पल विहिरीतील पाण्यावर तरंगताना दिसली. दरम्यान, विहिरीतील पाणी कमी करून गळ टाकण्यात आला. 

विवाहितेचा मृतदेह गळाला
यावेळी दुर्गा विजय बोरकर या विवाहितेचा मृतदेह गळाला लागला. सदर मृतदेह विहिरीतून बाहेर काढून पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केला. याप्रकरणी विजय भगवान बोरकर यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक माधवराव गरुड, एपीआय राहुल जंजाळ यांच्या मार्गदर्शनात पीएसआय अशोक रोकडे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com