मोताळा - नवरात्री उत्सवासाठी पुण्यावरून गावाकडे परत येणाऱ्या २५ वर्षीय विवाहितेचा धावत्या ट्रॅव्हल्समध्ये विनयभंग झाल्याची घटना शनिवारी ता. २० पहाटे पाच वाजताच्या सुमारास जालना ते देऊळगाव राजा रस्त्यावर घडली. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.