
पुसद (जि. यवतमाळ) : कोरोनामुळे लग्नाच्या 'इव्हेंट'ची हवाच निघून गेली आहे. अतोनात खर्चाला आपोआपच चाप बसला आहे. ही एक चांगली सुरुवात आहे. कठीण काळातही काय चांगले घेता येईल, करता येईल, असा विचार प्रगल्भ विचारांचे लोक करतात. याचा प्रत्यक्ष प्रत्यय पुसद येथील जाधव आणि दुधाट परिवाराने साध्या पद्धतीने लग्न समारंभ पार पाडल्याने आला.
ना वरात, ना वऱ्हाड, मोजक्याच नातेवाइकांच्या उपस्थितीत विवाहसोहळे सध्या पार पडत आहेत. साध्या पद्धतीने लग्न; समाजाला नवी दिशा देऊन पुसद येथील जाधव कुटुंबातील उच्चशिक्षित युवकाचा विवाहसोहळा रविवारी (ता. १४) वानरे मंगल कार्यालयात मोजक्याच वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत आनंदात पार पडला.
पुसद येथील अविनाश जाधव यांचे चिरंजीव ऋषिकेश व राजेंद्र दुधाट यांची मुलगी रक्षंदा यांचा लग्नसोहळा कोरोना प्रोटोकॉलनुसार अतिशय सध्या पद्धतीने पार पडला. कुटुंबातील आप्तस्वकीय यावेळी उपस्थित होते. ना वरात, ना बॅंडबाजा, ना कुठलाही झगमगाट अगदी साध्या पद्धतीने पार पडलेल्या या सोहळ्यात कुठेही बडेजाव नव्हता. डोक्याला मुंडावळ्या व तोंडाला मास्क, अशा सजलेल्या नवरदेव-नवरींनी एकमेकांच्या गळ्यात पुष्पहार घातले अन् टाळ्यांच्या गजरात मंगलअक्षता उधळल्या गेल्या.
हेही वाचा : प्रेमविवाहाचा करुण अंत, गर्भपात झाल्याने नवविवाहितेने केले असे
लॉकडाउनमधील हे विवाहसोहळे पिढ्यान्पिढ्या लक्षात राहतील. कोरोनाने समाजाला एक वेगळी दिशा दिली आहे. लग्नासाठी होणा-या अवाढव्य खर्चाला फाटा बसला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांचे लग्नावर खर्च होणारे लाखो रुपये वाचले आहेत. लॉकडाउनमुळे या वर्षी अनेकांनी लग्नकार्य पुढे ढकलले आहेत, तर काहीजण मुहूर्ताला महत्त्व देत सरकारच्या नियमांचे पालन करीत नियोजित मुहूर्तावरच लग्नसोहळे आटोपण्यास प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.