
बुलडाणा : गेल्या अनेक दिवसांपासून विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या अशा एकल जीवन जगणाऱ्या महिलांना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी, त्यांचा पुनर्विवाह व्हावा, या भावनेतून कार्य करणाऱ्या डी. एस. लहाने यांनी मानस फाउंडेशनच्या माध्यमातून पुनर्विवाह सोहळा आयोजित केला आणि त्यामध्ये दहा जोडपी विवाहबद्ध झाली.