यवतमाळ : शहरातील दर्डानगरात पाच दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने ५ अग्नीशस्त्रे, ३५० जिवंत काडतूस, एक धारदार तलवार, बुलेट प्रूफ जॅकेट व इतर साहित्य, असा एकूण ७ लाख ७८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता..या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला उत्तराखंडमधील देहरादूनमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. कामरान अहमद, असे ताब्यात घेतलेल्या तस्कराचे नाव आहे. आरोपीला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे..शहरातील दर्डा नगरातील रणवीर रमन वर्मा याच्याकडे घातक शस्त्रे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे संतोष मनवर यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर ३० जून रोजी छापा टाकला असता, आरोपीकडे वेगवेगळ्या प्रकारचे ५ अग्नीशस्त्रे, ३५० जिवंत काडतूस, एक धारदार तलवार, बुलेट प्रूफ जॅकेट व इतर साहित्य आढळून आले होते. .आरोपीने उत्तर भारतातील देहरादून येथील रायफल व काडतूस तस्कर कामरान अहमद याच्याकडून खरेदी केल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर विशेष पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष मनवर, पवन राठोड यांच्या नेतृत्वात एक पथक उत्तराखंडमधील देहरादून येथे रवाना केले होते..पथकाने देहरादून गाठून शस्त्र तस्करीच्या नेटवर्क विषयी माहिती गोळा केली. त्याचप्रमाणे सापळा रचून कामरान अहमद याला बेड्या ठोकल्या. त्यानंतर आरोपीला देहरादून येथील न्यायालयात हजर करून ट्रान्झिट वॉरंटवर यवतमाळ आणण्यात आले. .Ashadhi Ekadashi Celebration At Shegaon: आषाढी निमित्त श्रींचे दर्शनास होणार भक्तांची गर्दी; मंदिरामध्ये निघणार पालखी परिक्रमा.न्यायालयाने आरोपीला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच रणवीर वर्मा याला ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. कामरान अहमद याच्यासोबत शस्त्र तस्करीमध्ये आणखी कोण सहभागी आहेत, याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून केल्या जात आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.