
अमरावती : पीडितेच्या तक्रारीवरून शिरखेड पोलिसांनी मठाचे प्रमुख संशयित सुरेंद्रमुनी तळेगावकर (वय ७५) व त्याचा अन्य एक साथीदार बाळासाहेब देसाई (वय ४०) या दोघांविरुद्ध सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून, पीडित मुलीच्या एका महिला नातेवाइकाने त्यात सहकार्य केल्याचा ठपकाही पोलिसांनी चौकशीत ठेवला आहे. त्यामुळे त्या महिला साथीदाराविरुद्ध गुन्ह्यात सहकार्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यात तिघाही संशयितांना अटक करण्यात आली, असे शिरखेडचे ठाणेदार सचिन लुले यांनी सांगितले.