
हिंगणा : आषाढी एकादशीला पंढरपूरला मोठ्या प्रमाणात गर्दी असते.अशा परिस्थितीत प्रत्येक भाविक दर्शनासाठी जाऊ शकत नाही. अशा भाविकांना पंढरपूर येथून आणलेल्या विठ्ठल व रूखमीणीच्या मूर्ती, पादुका व ग्रंथ दर्शन सोहळा डिगडोहमधील माऊली ग्रुपतर्फे रविवारी (ता.६)सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती माऊली ग्रुपचे अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे व सुरेश काळबांडे यांनी गुरुवारी ( ता.३) आयोजित पत्रकार परिषदेत दिली.