Maya Sonwane
sakal
साकोली - उमरझरी शिवारात वाघिणीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या माया रामकृष्ण सोनवाने (वय-५०) यांचे बुधवारी रात्री नागपूर येथे रुग्णालयात निधन झाले. त्यांची तीन दिवसांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज संपली अाहे. दरम्यान, नागरिकांचा उद्रेक होऊ नये यासाठी गुरुवारी परिसरात अतिरिक्त पोलिस दलाचा बंदोबस्त असून वन कर्मचाऱ्यांनासुद्धा तैनात केले आहे.