एमडीच्या जागा वाढवण्यासाठी "टास्क फोर्स' 

केवल जीवनतारे - सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

नागपूर - वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासोबतच बदलत्या काळात जागतिक स्पर्धेत तग धरून संशोधनाला चालना मिळावी, या हेतूने राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अभ्यासक्रमांसह पदव्युत्तर विद्यार्थ्यांची (एमडी) संख्या वाढविण्यासाठी "टास्क फोर्स' निर्माण करण्यात येणार आहे. 

नागपूर - वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासोबतच बदलत्या काळात जागतिक स्पर्धेत तग धरून संशोधनाला चालना मिळावी, या हेतूने राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अभ्यासक्रमांसह पदव्युत्तर विद्यार्थ्यांची (एमडी) संख्या वाढविण्यासाठी "टास्क फोर्स' निर्माण करण्यात येणार आहे. 

पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी तयार होणाऱ्या टास्क फोर्समध्ये प्री-क्‍लिनिकल आणि परा-क्‍लिनिकल विभागातील एक तसेच क्‍लिनिकल विभागाशी संबंधित सहयोगी प्राध्यापकाचा समावेश राहील. अधिष्ठात्यांच्या पुढाकाराने तयार झालेले "टास्क फोर्स' संबंधित वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मनुष्यबळ, मूलभूत सुविधा व उपकरणे तसेच प्रत्येक विभागातील "इन्फ्रास्ट्रक्‍चर'चा अभ्यास करून अहवाल तयार करतील. या अहवालानुसार किती पदव्युत्तर विद्यार्थ्यांची संख्या वाढेल याचा अंदाज टास्क फोर्स घेईल. अंतिम अहवाल वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाकडे सादर करणात येईल. बदलत्या काळाची पावले ओळखून वैद्यकशास्त्रातील अभ्यासक्रमात विविध विषय घटकांच्या सहयोगातून "बायो-मेडिकल'च्या क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. वैद्यकीय साधनसामग्री (मेडिकल डिवायसेस) रोगनिदानाकरिता लागणाऱ्या साधनांचे (डायग्नोस्टिक डिवायसेस) क्षेत्र मोठे आहे. व्हेंटिलेटर, सीटी स्कॅन, एमआरआय, हृदयरोगाच्या निदानासाठीची आवश्‍यक वैद्यकीय उपकरणे "बायो-मेडिकल' शाखेमुळे जन्माला आली. याशिवाय "मेडिकल ट्रान्सक्रिप्शन' हा वैद्यकीय क्षेत्रातील रोजगाराचा नवा अभ्यासक्रम ठरू शकतो. अशाप्रकारे वैद्यकीय अभ्यासक्रमांत नवीन विषयांची संख्या वाढवण्यासंदर्भातील वैद्यकीय सहसंचालक यांच्या स्वाक्षरीद्वारे 4 नोव्हेंबर 2016 रोजी काढण्यात आलेले परिपत्रक वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने राज्यातील 16 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना पाठवले. सात दिवसांत संबंधित वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातांकडून अहवाल मागवला आहे. 

उद्या मुंबईत बैठक 
वैद्यकशास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासंदर्भातील बैठक 8 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता वैद्यकीय संचालनालय येथे आयोजित केली आहे. टास्क फोर्स सदस्यांमधील एका प्रतिनिधीला बैठकीला उपस्थित राहणे बंधनकारक असल्याची माहिती या पत्रात नमूद आहे.

Web Title: MD increase of Task Force