एमडीच्या जागांमध्ये राज्यात मेडिकल टॉपवर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

नागपूर : मेडिकलमध्ये 2012 मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (एमडी) सुमारे 110 जागा होत्या. तीन वर्षांत प्रशासनाच्या प्रयत्नातून एमडीच्या जागांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सद्या 178 पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा असून, पुन्हा यात 10 जागांची भर पडली आहे. या जागा वाढीमुळे मेडिकल सध्या एमडीच्या विद्यार्थीसंख्येत टॉपवर आहे.

नागपूर : मेडिकलमध्ये 2012 मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (एमडी) सुमारे 110 जागा होत्या. तीन वर्षांत प्रशासनाच्या प्रयत्नातून एमडीच्या जागांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सद्या 178 पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा असून, पुन्हा यात 10 जागांची भर पडली आहे. या जागा वाढीमुळे मेडिकल सध्या एमडीच्या विद्यार्थीसंख्येत टॉपवर आहे.
राज्यात मुंबईनंतर नागपूरच्या मेडिकलमध्ये दरवर्षी सात लाखांवर रुग्ण उपचारासाठी येतात. त्या तुलनेत डॉक्‍टरांची संख्या तोकडी होती. ही बाब लक्षात आल्यानंतर 2012 मध्ये भारतीय वैद्यक परिषदेने 112 जागा वाढण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे फॅक्‍सद्वारे कळविले होते. परंतु, त्यावेळी या जागांमध्ये वाढ झाली नाही. दरम्यान, मेडिकलच्या अधिष्ठातापदावर डॉ. अभिमन्यू निसवाडे यांची नियुक्ती झाली. त्यांना रुग्णसेवेसाठी मेडिकलमध्ये डॉक्‍टरांना संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र दिसले. बहुतांश ग्रामीण रुग्णालयांमधून रेफर केलेल्या रुग्णांप्रमाणाचे सुमारे चार राज्यातील 30 टक्के रुग्ण येथे येतात. यामुळे बालरोगतज्ज्ञ, सर्जरी, मेडिसीन, प्रसूती विभाग, अस्थिव्यंगोपचार विभागासह भूलशास्त्र विभागात सेवेचा दर्जा उंचावणाऱ्या तज्ज्ञ डॉक्‍टरांचा तुटवडा भासत असल्याचे पावलोपावली दिसून आले.
24 तास निवासी डॉक्‍टर रुग्णसेवेला वाहून घेतल्यामुळे त्यांच्यावरही कमालीचा ताण येतो. यातूनच मारहाणीच्या घटना घडतात. यामुळेच उपलब्ध इन्फ्रास्ट्रक्‍चरमध्ये थोड्या सुधारणार करून एमडीच्या जागा वाढण्यासाठी प्रयत्न केले. फॉर्माकोलॉजी विषयात एमडीच्या दोन जागा होत्या. परंतु, चार जागा वाढल्यामुळे आता ती संख्या सहा वर पोहोचली तर पीएसएम विभागात सहा जागा वाढल्यामुळे आता येथील निवासी डॉक्‍टरांची संख्या नऊवर पोहोचली आहे.
अशा वाढल्या जागा
वर्षे वाढलेल्या जागा
2017 35
2018 26
2019 10

मेडिकलमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सध्या 178 जागा आहेत. यात किमान 10 जागांची भर पडली. यामुळे 188 एमडीच्या जागा झाल्या आहेत. जागा वाढल्यानंतर मेडिकल असो की इतर कोणतेही वैद्यकीय महाविद्यालय, येथे भारतीय वैद्यक परिषदेच्या निकषानुसार इन्फ्रास्ट्रक्‍चर, सोयी-सुविधा वाढवाव्या लागतात. रुग्णहितासाठी डॉक्‍टरांच्या जागा वाढणे हे वरदान ठरते.
-डॉ. अभिमन्यू निसवाडे,
अधिष्ठाता, मेडिकल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Medical top position in MD seats