
हिवरा आश्रम : जिंदगी काँटो का सफर है... हौसला इसकी पहचान है... रास्ते पर तो सभी चलते है... जो रास्ते बनाये वही इंसान है... भोळा भावडया दैववादाला भिक न घालता... स्वतःच्या मनगटाच्या ताकदीवर अतूट विश्वास... कर्तव्याप्रती असलेली एकनिष्ठता व स्वतःवरील दुर्दम्य आत्मविश्वासाच्या जोरावर कुठलेही यश सहज प्राप्त करता येते. याचा प्रत्यय नुकताच मेहकर तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथील समाधान प्रकाश जाधव या विद्यार्थ्यांने प्रतिकूल परिस्थिती सेल्फ स्टडीच्या मदतीने फुड सेप्टी ऑफिसर परीक्षेत मिळविलेल्या यशाच्या रूपाने दिसून आले.