Buldhana News: तळपत्या तापमानाने शेती कामांना लागला ब्रेक!; नांगरणी-मशागत कामे ठप्प; शेतकरी चिंतेत

Challenges in Ploughing and Land Preparation: हिवरा आश्रम भागात एप्रिल अखेरीस तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यामुळे नांगरणी, कुळवणी, बांध दुरुस्ती आणि खत व्यवस्थापन यांसारखी शेती कामे ठप्प झाली आहेत.
Buldhana News

Buldhana News

esakal

Updated on

हिवरा आश्रम: मेहकर तालुक्यात यंदाचा उन्हाळा केवळ ऋतू न राहता शेतीसाठी गंभीर संकट ठरत आहे. एप्रिलच्या अखेरीसच तापमान ३८-४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने पेरणीपूर्व शेती कामावर मोठा परिणाम झाला आहे. नांगरणी, कुळवणी, बांध दुरुस्ती, खत व्यवस्थापन यांसारखी मूलभूत कामे रखडल्याने संपूर्ण हंगाम धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कडक उन्हामुळे दुपारच्या सत्रातील काम पूर्णपणे ठप्प झाले असून शेतकऱ्यांना सकाळ संध्याकाळच्या मर्यादित वेळेतच काम उरकावे लागत आहे. मात्र हा वेळ अपुरा ठरत असल्याने कामांचा वेग मंदावला आहे. यासोबतच मजुरांची कमतरता ही मोठी अडचण ठरत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Beed News
Jalna News
Chhatrapati Sambhajinagar
Buldhana News
Marathi News Esakal
www.esakal.com