"वंचित' फॅक्‍टरमुळे वाढली कॉंग्रेस आघाडीची चिंता

विनोद झाल्टे
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

मेहकर (बुलडाणा ) : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष लागले असताना कॉंग्रेस व राष्ट्रवादी यांची आघाडीत हा मतदारसंघ कॉंग्रेसला सुटणार याबाबत खासगीत बोलले जात आहे. त्यामुळे कॉंग्रेसकडून उमेदवारीसाठी भाऊगर्दी झाली आहे. तर, राष्ट्रवादीला मतदारसंघ सुटल्यास केवळ ऍड. साहेबराव सरदार हेच एकमेव उमेदवार असणार आहेत. युती न झाल्यास 4 ते 5 जण भाजपकडून इच्छुक राहतील. यावेळी नव्याने निर्माण झालेली वंचित बहुजन आघाडी ही दोन्ही कॉंग्रेससाठी चिंतेची बाब राहणार आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हे प्रचंड मताधिक्‍क्‍याने विजयी झाले. त्यामुळे साहजिकच जिल्ह्यासह तालुक्‍यात शिवसेनेची ताकद वाढली असल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरून दिसत आहे. मात्र, ही ताकद शिवसेनेची आहे की, मोदी लाटेची हे गुलदस्त्यात आहे. मेहकर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी गेली 10 वर्षांपूर्वी राखीव झाल्याने खासदार प्रतापराव जाधव यांचे विश्‍वासू असलेले आमदार संजय रायमूलकर यांना उमेदवारी देऊन निवडून आणले. आमदार रायमूलकर यांनी खासदार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासकामे करीत आपल्या कामाचा झंझावात कायम ठेवला. त्यामुळे तेच उमेदवार असतील असे सध्या तरी दिसते आहे.
दुसरीकडे आघाडी न झाल्यास कॉंग्रेसचे वतीने तंत्र व उच्च शिक्षण विभागाचे सचिव सिद्धार्थ खरात यांच्यासह इंटक नेते लक्ष्मण घुमरे व ऍड. अनंतराव वानखेडे हे कॉंग्रेस पक्षाकडून इच्छुक आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसला हा मतदारसंघ सुटल्यास मागील वेळी उमेदवार असलेल्या अश्विनी आखाडे किंवा ऍड. साहेबराव सरदार हेच इच्छुक दिसत आहे. शिवसेना-भाजप युती न झाल्यास भाजपकडून श्रीमती मंदाकिनी कंकाळ, माजी उपसभापती सतीश ताजने, प्रा. प्रकाश गवई आदींनी गेल्या साडेचार वर्षांत पक्षवाढीसाठी मेहनत घेऊन पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडली. सध्या तरी वंचित आघाडीकडून उमेदवार इच्छुक दिसत नसले तरी युती व आघाडी नंतरच सर्व गणिते समोर येणार आहे एवढे मात्र खरे.

स्थानिकांना संधी की, आयातीत उमेदवार?
कॉंग्रेस पक्षाची मेहकर व लोणार तालुक्‍यात चांगली पकड आहे. दोन्ही ठिकाणच्या नगरपालिकावर नगराध्यक्ष याच पक्षाचे आहेत. लोणार न. प. मध्ये 10 नगरसेवक आहेत, तर 10 पंचायत समिती सदस्य आहेत. एक जि. प. सदस्य आहे. तसेच मेहकर नगरपालिकेत नगरसेवक 9 न. प. सदस्य व एक अपक्ष असे 10 आहेत. तर एक जि. प. सदस्य आहे. नगराध्यक्ष कासम गवळी यांचे शहरात चांगले प्रस्थ असल्याने त्याचा चांगला फायदा कॉंग्रेसला होऊ शकतो. भारतीय जनता पक्षाने मागील वेळी युती तुटल्यावर मित्र पक्ष असलेल्या रिपाइं गटाला संधी देत नरहरी गवई या उमेदवाराला ऐनवेळी आयात केले. त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांची गोची झाली. यावेळी युती न झाल्यास भाजप स्थानिकांना उमेदवारी देणार की, पुन्हा उमेदवार आयात करणार हे येत्या काळात दिसणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mehkar vidhansabha constituency