Amravati News: प्रसूत महिलेला नेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी केली खाटेची कावड; शेतातून चार किलोमीटर पायपीट करीत वाचविला जीव
Melghat Health Team Walks 4 km to Save Critical Postpartum Woman: मेळघाटातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून सिकलसेलने ग्रस्त प्रसूत महिलेचा कावडच्या साहाय्याने जीव वाचविण्यात यश. चार किलोमीटर पायी जाऊन कर्मचाऱ्यांनी दाखवला सेवाभाव.
अचलपूर : मेळघाटचा आरोग्य विभाग काही कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे बदनाम होत असला तरी आजही आपल्या कामाच्या प्रति काही कर्मचारी इमानदार असल्याचे दिसून येते. याचाच प्रत्यय मेळघाटात पुन्हा एकदा दिसून आला.