
अचलपूर: कुपोषणामुळे जगाच्या नकाशावर आलेल्या मेळघाटात आजही आदिवासींमध्ये अंधश्रद्धेचा पगडा कायम असल्याचे पुन्हा पुन्हा उघड होत आहे विज्ञानाच्या युगातही अंधश्रद्धेचे चटके किती दाहक असू शकतात याचा वेदनादायी प्रत्यय मेळघाटच्या दहेंद्री गावात आला. अवघ्या २२ दिवसांच्या नवजात बाळाला गरम सळईने पोटावर चटके दिल्याने खळबळ उडाली आहे.
असाच एक अमानुष प्रकार ३ जून रोजी उघडकीस आला होता. आता पुन्हा एकदा गावातील २७ दिवसाच्या बालकाच्या पोटावर चटके दिल्याची घटना उघडकीस आली आहे. आठवड्याभरात दोन घटना घडल्याने मेळघाटात आजही अंधश्रद्धा कायम असल्याचे दिसून येत आहे. या अघोरी प्रथेला मुळापासून उखडून टाकण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर पुन्हा एकदा उभे ठाकले आहे.