Melghat Tiger Attack: मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित गाभा क्षेत्रात अवैधरित्या गोवंश हाकलणाऱ्या व्यक्तीवर वाघाचा हल्ला होऊन मृत्यू झाला. जंगलाला आग लावल्याची घटना घडल्याने वनविभागाच्या तपासाखाली गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.
हिवरखेड : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित गाभा क्षेत्रात बारूखेडा ते सोमठाणा दरम्यान दोन मजूर अवैधरित्या गोवंश हाकलून नेत होते. त्यापैकी गुलजार नावाच्या इसमावर वाघाने हल्ला केला.