हिवरखेड : नजिकच्या हनुमान सागर, वान प्रकल्प धरणाच्या मागील बॅक वाटर परिसर, म्हणजेच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वान रेंज मधील नागरतास बॅक वॉटर परिसरात, पाण्यामध्ये एक सुदृढ बिबट संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे..मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक आणि वरिष्ठ वन अधिकारी आदर्श रेड्डी यांनी तसेच डीएफओ राहुलसिंग तोलिया यांनी पाण्यामध्ये बिबट्याच्या मृत्यू झाल्याच्या घटनेस दुजोरा दिला आहे. स्थानिक सूत्रांच्या माहिती नुसार दि.१८ फेब्रुवारीपासून बिबट मृत पावला असून, सदर परिसरात कोणालाही येऊ जाऊ दिल्या जात नाही. त्यामुळे परिस्थिती संशयास्पद होत असून, आता सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे की, ज्या ठिकाणी सोलापूरहून ९ मगरी आणून सोडलेल्या आहेत अगदी त्याच ठिकाणी बिबट पाण्यात मृत आढळला आहे..त्यामुळे मगरींच्या हल्ल्यातच बिबट मृत पावल्याची शक्यता जवळच्या परिसरातील नागरिक नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त करीत आहेत. यापूर्वी सदर परिसरात वाघ, बिबट सारखे प्राणी पाण्यामध्ये मृत पावल्याची घटना नजीकच्या काळात निदर्शनास आलेली नाही. मात्र, वन अधिकाऱ्यांच्या मते त्यांच्याकडे एक फोटो आलेला असून, त्यामध्ये बिबट पाण्यामध्ये मृत अवस्थेत दिसत आहे. त्याचे पूर्ण शरीर प्रथम दर्शनी कायम असून, कोणताही भाग कमी झाल्याचे निदर्शनास येत नाही..पोस्टमार्टम सुरू असून त्याचा रिपोर्ट आल्यानंतर परिस्थिती स्पष्ट होईल असे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, एवढी मोठी घटना झाल्यावरही त्याचा एकच फोटो कसा येतो आणि तो सुद्धा मीडियाला का दिला जात नाही? पाण्यात बिबट मृतावस्थेत दिसत असून, पाण्याच्या आतील भाग गायब आहे की नाही हे कसे कळणार? जर मगरीच्या हल्ल्यातच बिबट्याचा मृत्यू झाला असेल तर त्या मगरी नागरिकांच्या, पर्यटकांच्या, तीर्थयात्रींच्या, शेतकऱ्यांच्या जीवाला धोका पोहोचवण्याच्या अगोदर मेळघाटातील वाघ, बिबट सारख्या महत्त्वाच्या वन्य प्राण्यांच्याच जीवावर गदा आणत आहेत अशी शक्यता प्रथमदर्शनी दिसून येत आहे..मगरीच्या मृत्यूनंतर बिबटाच्या मृत्यूचेही गुढसोलापूरवरून नऊ मगरी आणल्यानंतर एक मगर मृत पावली होती. तिचा पोस्टमार्टम रिपोर्ट जवळपास तीन आठवडे होत असतानाही अद्याप प्राप्त झालेला नसल्याचे मगरीचा मृत्यू कसा झाला हे अद्यापही निष्पन्न झालेले नाही असे रेड्डी यांनी सांगितले. मगरीचा मृत्यू हा आपसी संघर्षामुळे झाला असल्याची माहिती राहुल सिंग तोलीया यांनी दिली. मात्र, बिबटचा मृत्यू कशामुळे झाला हे सिद्ध व्हायलाही बराच काळ लागणार आहे. या सर्व घटनाक्रमामुळे संशयाचे वातावरण गडद होत असून, वन विभागाने संपूर्ण पारदर्शकता ठेवून त्या नऊ मगरी आणणे आणि बिबट्याचा संशयास्पद मृत्यू, या दोन्ही प्रकरणांची सखोल आणि विस्तृत माहिती जनतेला देण्याची मागणी केली जात आहे..Leopard Attack : आईवडिलांसमोर चिमुकल्या हियांशला बिबट्याने उचलले; गोंदिया जिल्ह्यातील खडकीवर शोककळा.मेळघाट व्याघ्र प्रकल्पात एक बिबट पाण्यात मृतावस्थेत आढळले असून, त्याचे पोस्टमार्टम करणे सुरू आहे. बिबट्याचे पूर्ण शरीर कायम दिसत असल्याने मगरीच्या हल्ल्यात अथवा शिकारीमुळे बिबट्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वाटत नाही. स्निफर्स डॉग बोलवण्यात आले असून, घटना कशामुळे घडली याचा शोध लावण्यात येत आहे.- राहुल तोलिया, डी.एफ.ओ., वनविभाग, अकोट.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.