याला म्हणतात नशीब! अल्पमतात असूनही 'ते' झाले सरपंच आणि उपसरपंच; विरोधकांच्या अज्ञानाचा फायदा 

men got post of sarpanch and deputy sarpanch even in less votes in Wardha district
men got post of sarpanch and deputy sarpanch even in less votes in Wardha district

गिरड (जि. वर्धा) : सरपंच आणि उपसरपंच पदाचा उमेदवारी अर्ज योग्य पध्दतीने न भरल्याने बहुमत असूनही अर्जच अपात्र ठरले व अल्पमतातील उमेदवारांना सरपंच , उपसरपंच निवडणूक अधिकाऱ्यांनी घोषित केल्याने बहुमतधारी सदस्यांना सत्तेपासून वंचित राहण्याचा प्रकार समुद्रपूर तालुक्यातील मोहगाव ग्रामपंचायतीत घडला. या प्रकारामुळे कट्टर राजकारण्यांच्या भोवया उंचावलेल्या असून राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

सात सदस्य असलेली मोहगाव गटग्रामपंचायतीत पाच गावांचा समावेश आहे. सत्ता प्राप्त करण्याकरिता चार सदस्यांचे बहुमत गरजेचे होते. जगदीश महातळे यांचे गटाकडे सत्ता प्राप्तीकरिता पाच सदस्यांचे पाठबळ होते. श्री. महातळे यांनी स्वतः सरपंचपदासाठी तर संदीप दातारकर यांनी उपसरपंचपदासाठी अर्ज भरले होते.

विरोधक अल्पमतातील दोन सदस्यापैकी विलास नवघरे यांनी सरपंच पदासाठी तर सपना बाभळे यांनी उपसरपंचपदासाठी अर्ज दाखल केले. जगदीश महातळे व संदीप दातारकर यांचे अर्ज पडताळणी केल्यानंतर दोघांच्याही अर्जावर सुचक म्हणून निवडून आलेल्या सदस्यांऐवजी गावातील नागरिकांची सही आढळल्याने नियमांप्रमाणे दोन्ही उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आले. 

अल्पमतातील दोन्ही योग्य अर्ज पात्र ठरवून विलास नवघरे यांना सरपंच तर सपना बाभळे यांना उपसरपंच घोषित करण्यात आले. यावेळी निवडणूक अधिकारी अशोक गिद्देवार, ग्रामसेवक संतोष पुरकाम यांनी निवडणूक प्रक्रिया नियमानुसार पार पाडली.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com