Mental Health Crisis : मानसिक आजाराचा विळखा होतोय घट्ट; अमरावती विभागात मनोविकार चिकित्सकांची कमतरता
Amaravati News: अमरावती विभागात मानसिक आजारांची संख्या वाढत असून, मनोविकार चिकित्सकांची आणि प्रशिक्षित समुपदेशकांची गंभीर कमतरता आहे. यवतमाळ, अकोला आणि वाशीम जिल्ह्यातही मानसिक आरोग्याच्या समस्यांचा वाढता प्रभाव दिसून येत आहे.
अमरावती : स्पर्धात्मक युगात समाजातील एक मोठा घटक केवळ शारीरिक फिटनेसला महत्त्व देत असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. मात्र, दुसरीकडे मानसिक आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनत चालली आहे.