मनोरुग्णांकडून केलेजाते शौचालय साफ

केवल जीवनतारे - सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 डिसेंबर 2016

तंबाखूचे आमिष दाखवून जुंपतात कामाला

नागपूर- नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात मनोरुग्णांना तंबाखूचे आमिष दाखवून त्यांच्याकडून शौचालय स्वच्छ करण्यापासून तर कपडे धुण्यापर्यंतची कामे करून घेतली जातात. उपचारासाठी आलेल्या मनोरुग्णांना तंबाखूची सवय लावली जाते. या नशेत ती अशी कामे करतात. अंगावर शहारे आणणारे सत्य खुद्द मनोरुग्णालयाच्या उपचारातून बरा झालेल्या एका व्यक्तीने उघड केले.

तंबाखूचे आमिष दाखवून जुंपतात कामाला

नागपूर- नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात मनोरुग्णांना तंबाखूचे आमिष दाखवून त्यांच्याकडून शौचालय स्वच्छ करण्यापासून तर कपडे धुण्यापर्यंतची कामे करून घेतली जातात. उपचारासाठी आलेल्या मनोरुग्णांना तंबाखूची सवय लावली जाते. या नशेत ती अशी कामे करतात. अंगावर शहारे आणणारे सत्य खुद्द मनोरुग्णालयाच्या उपचारातून बरा झालेल्या एका व्यक्तीने उघड केले.

मनोरुग्ण अशी कामे करीत असताना परिचारिका मात्र बघ्याची भूमिका निभावतात. मनोरुग्णांवर उपचारासह पुनर्वसनातून पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा हेतू मनोरुग्णालय स्थापन करण्याचा आहे. परंतु मनोरुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीच या हेतूला हरताळ फासला. त्यांना धाकदपट करून तंबाखू खाऊ घालून त्यांच्याकडून साफसफाईची कामे करून घेण्याचे कृत्य केले जाते. स्वच्छतेची कामे करण्यासाठी चतुर्थश्रेणी कर्मचारी वर्ग आहे. परंतु मनोरुग्ण सकाळी उठल्यापासून काम करत असल्याचा गौप्यस्फोट संदेश (बदललेले नाव) ने केला. तंबाखूच्या नशेत हे मनोरुग्ण कंबर दुखेपर्यंत काम करत असल्याची माहिती त्याने दिली.

सकाळी साडेसात-आठ वाजता साफसफाईची वेळ असते. तंबाखू मिळेल या आशेवर कर्मचारी दिसताच मनोरुग्ण पुढे येतात. तंबाखूची मागणीही करतात. पुडी दाखवली की, एक नाही, अनेक पाच ते दहा मनोरुग्ण धावत येतात. मनोरुग्णांना तंबाखू खायला दिला की, ते आपोआपच हातात झाडू घेतात. कोणी हातात कपडे धुतात. काही बरे झालेले रुग्ण तंबाखू मिळाल्यानंतरही कामे करण्यास नकार देतात, अशा मनोरुग्णांना मात्र मार सहन करावा लागतो. मारहाण झाल्यानंतर अनेक मनोरुग्णांना मेडिकलमध्ये उपचारासाठी पाठवले जात असल्याचेही तो म्हणाला. प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण नवखरे यांच्याशी संपर्क केला. परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

मनोरुग्ण डॉक्‍टरांसाठीही टाकलेला विषय
मनोरुग्णांविषयी ममत्वाचे नाते मनोरुग्णालयातील डॉक्‍टरांमध्येही उरले नाही. येथील डॉक्‍टरांसाठी मनोरुग्ण टाकलेला विषय राहिला आहे. भरती असलेल्या साडेसहाशेवर (महिला आणि पुरुष) मनोरुग्णांसाठी संगीत, भजन, गाणी, प्रार्थना असे उपक्रम चालवले जातात. मात्र येथील डॉक्‍टर हट...हट... असे म्हणून झिडकारतात, हे सांगताना मनोरुग्णालयातील डॉ. कुथे आणि डॉ. धवड रुग्णांशी प्रेमाने वागत असल्याचे सांगण्यास संदेश विसरला नाही.

टाटा ट्रस्ट करीत आहे अभ्यास...
मनोरुग्णांना आंघोळीसाठी गरम पाणी मिळावे, यासाठी सोलर हिटर लावले. परंतु नादुरुस्त असल्याने थंडीत हुडहुडी भरते. अशावेळी मनोरुग्ण आजूबाजूच्या झुडपातून काडीकचरा, लाकडं गोळा करतात. चूल पेटवून पाणी गरम करतात. अशी दयनीय अवस्था येथील आहे. यावर्षी टाटा ट्रस्टतर्फे मनोरुग्णालयात संशोधन सुरू आहे. त्यांच्याकडेही मनोरुग्ण कापडं धुण्यापासून तर स्वच्छतेची कामे करीत असल्याचे पुरावे असतील. टाटाकडे आल्यास मनोरुग्णालय सुधारेल, असेही तो म्हणाला.

Web Title: mental patient clean the toilet