esakal | विदेशी पाहुणा बार हेडेड गुजचे अकोला जिल्ह्यात दर्शन
sakal

बोलून बातमी शोधा

kapsi

हिमालयाची 30 हजार फुट उंचीपार करून भारतात
चार हजार किलोमीटरचे अंतर पार करीत अकोला जिल्ह्यात दाखल

विदेशी पाहुणा बार हेडेड गुजचे अकोला जिल्ह्यात दर्शन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या वाशीम रोडवरील कापशी तलावावर युरोपातून स्थलांतरित झालेल्या ‘बार हेडेड गुज’ पक्ष्यांचे आगमण झाले. तब्बल चार हजार किलोमीटर अंतराचा प्रवास करून आणि हिमालयाच्या 30 हजार फुट उंचीवरून हे पक्षी अन्नाच्या शोधात भारतात दाखल झाले आहे.
रविवारच्या सुटीची संधी साधत पक्षी निरीक्षणाला गेलेले लक्ष्मीशंकर यादव, विवेक कोकाटे व सौ. कोकाटे, डॉ. जिराफे यांना सकाळी 10.15 वाजता कापशी तलावावर ‘बार हेडेड गुज’ या पक्ष्यांचा थवा दिसला. हा पक्षी युरोपातील मंगोलिया येथून सुमारे 4 हजार 300 किलोमीटर अंतराचा प्रवास करून अकोला जिल्ह्यामध्ये दाखल झाला असण्याची शक्यता पक्षी निरीक्षकांनी व्यक्त केली आहे.

मंगोलिया, सायबेरिया, रशिया, अलास्का, युरोप, कजाकस्थान आदी उत्तर ध्रुवाकडील देशामध्ये या कालावधित मोठ्या प्रमाणात बर्फ पडतो. यामुळे खाद्यासाठी पक्षी स्थलांतर करतात. यात भारतात येणाऱ्या पक्ष्यांची संख्या मोठी आहे. कापशी तलाव परिसरात 34 पक्षी असलेला थवा दिसून आला. हिमालयाच्या साधारण 30 हजार फूट उंचीवरून ते या परिसरात दाखल झाले असल्याचा अंदाज आहे. अशा वातावरणात आॅक्सिजनचे प्रमाण फार कमी असते. वाऱ्याचा प्रचंड वेग असतो. विपरित परिस्थितीत प्रवाश करीत हे पक्ष स्थलांतर करीत असल्याचे पक्षी निरीक्षक यादव यांनी सांगतिले. 


असा असतो ‘बार हेडेड गुज’
बार हेडेड गुज हा स्थलांतरित पक्षी युरोपातून भारतात येतो. याची मान व चालणे आकर्षित करते. मानेवर काळ्या रंगाचा पट्टा असतो. त्यामुळेच याला बार-हेडेड गुज म्हणून ओळखतात. भारतामध्ये हा पक्षी राजहंस म्हणून ओळखला जातो. आठ हजार उंची वरून उडणारा हा एकमेव पक्षी असल्याचे, पक्षी संशोधक लक्ष्मीशंकर यादव यांनी सांगितले. 

थंडीमुळे नव्हे तर स्थलांतरानंतर आगमण
विदेशी पक्षी सर्वसाधारणपणे युरोप, दक्षिण आफ्रिका या खंडांसह सायबेरिया, अफगाणिस्तान, हिमालय या भागातून स्थलांतर करून विदर्भात येतात. त्यांच्या मूळ प्रदेशात या काळात कमालीची थंडी किंवा काही ठिकाणी हिमवृष्टी होत असते. त्यामुळे तेथील पक्षी जीवन बाधित होते. त्यांना खाद्यान्नाचा तुटवडा भासू लागतो. परिणामी हे पक्षी भारतीय उपखंडातील विविध ठिकाणी स्थलांतर करतात. विदर्भातील थंडीचा आणि या पक्ष्यांच्या स्थलांतराशी संबंध नाही. निवडक जलस्थाने, माळरानांवर अन्न शोधतात. तीन-चार महिन्यांच्या वास्तव्यानंतर हे पक्षी पुन्हा मूळ स्थानी परततात. दरवर्षी हाच क्रम अनुभवण्यास मिळतो, असे यादव यांनी सांगितले. 

loading image
go to top