मिकी बक्षीची कारागृहात रवानगी

ok
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

नागपूर : रिषी खोसला हत्याकांडाचा मास्टरमाईंड मिक्‍की बक्षी याची न्यायालयाने मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे. तर, सुपारी किलर गिरीश दासरवार याच्या पोलिस कोठडीत 2 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली. यापूर्वी राहुल ऊर्फ बबन कलमकर, कुणाल हेमणे, आरिफ इनायत खान आणि अझीज अहमद हे सदर पोलिसांच्या कोठडीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरचे ठाणेदार महेश बनसोडे यांनी आरोपींना न्यायालयात उपस्थित केले होते. न्यायालयाने मिक्‍की बक्षीला न्यायालयीन कोठडी सुनावत कारागृहात रवानगी केली. तर आरोपींना सुपारी देणारा गिरीश दासरवार याच्या कोठडीत वाढ केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: miki bakshi sent to jail