
अमरावती : रहाटगाव येथील स्मशानभूमीची जागा तसेच प्राचीन शिवमंदिराच्या परिसरात काही मंडळींकडून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले आहे. नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतरही प्रशासनाकडून कुठलेही सहकार्य केले जात नसल्याने आज अखेर राष्ट्र उन्नती संघटनेचे पदाधिकारी तसेच रहाटगाव येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या फोटोला मंत्रोच्चारात दुग्धाभिषेक केला.