शहरातील बिल्डरांकडून कोट्यवधी वसूल

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 September 2019

नागपूर : मागील काही दिवसांत शहरातील बिल्डरांवर घातलेल्या छाप्यातून अनेकांकडे जीएसटी थकीत असल्याची बाब उघडकीस आली होती. संपूर्ण चौकशीनंतर जीएसटी विभागाने जीएसटीची वसुली सुरू केली असून कोट्यवधींचा महसूल जमा केला.

नागपूर : मागील काही दिवसांत शहरातील बिल्डरांवर घातलेल्या छाप्यातून अनेकांकडे जीएसटी थकीत असल्याची बाब उघडकीस आली होती. संपूर्ण चौकशीनंतर जीएसटी विभागाने जीएसटीची वसुली सुरू केली असून कोट्यवधींचा महसूल जमा केला.
शहरातील ग्रीन सिटी बिल्डर्स, परदेशी कंस्ट्रक्‍शन, कुकरेजा ऍम्बसी, जेडी बिल्डकॉन आदी बिल्डरांवर जीएसटी विभागाने अचानक छापे घातले होते. या छाप्यात विक्रीपत्र आदी दस्तऐवज जीएसटी विभागाने आपल्या ताब्यात घेतले होते. कागदपत्रांच्या तपासणीनंतर बिल्डरांकडे कोट्यवधी जीएसटी थकीत असल्याची बाब पुढे आली होती. अद्यापही कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. सुरुवातीच्या तपासणीनंतर बिल्डर्सवर 10 कोटी 40 लाखांची थकीत रक्कम निश्‍चित करण्यात आली. यातील 4.52 कोटी वसूल करण्यात आले. यात ग्रीनसिटी बिल्डर्सकडून 58.17 लाख, परदेसी कंस्ट्रक्‍शनकडून 15 लाख, कुकरेजा ऍम्बेसीकडून 17.50 लाख, जेडी बिल्डकॉनकडून 21 लाख वसूल करण्यात आले. ग्रीन सिटी बिल्डर्सवर 2 कोटी, परदेसी कंस्ट्रक्‍शनवर 1.35 कोटी, कुकरेजा ऍम्बेसीवर 4.86 कोटी, जेडी बिल्डकॉनवर 40 लाखांची थकीत रक्कम निश्‍चित करण्यात आली. इतर बिल्डरांवरही कर निश्‍चित करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे नागपूर झोन कार्यालयाने कळविले आहे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Millions recovered from the city builders