Yavatmal Accident : ट्रकचा टायर फुटून मजुराचा मृत्यू; सहा गंभीर जखमी; नेर अमरावती रोडवरील घटना
Neri Amravati Road Accident : नेर-अमरावती रोडवरील मोझर गावाजवळ मजूर घेऊन जाणारा मीनी ट्रक पलटी होऊन अपघात झाला. एका मजुराचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
Yavatmal Accident: Labourer Dies, 6 Injured After Truck Tyre Burstesakal
नेर (जि. यवतमाळ) : येथून नांदगाव खंडेश्वर येथे मजूर घेऊन जात असलेल्या मीनी ट्रकचा टायर फुटल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात एका मजुराचा मृत्यू, तर सहा मजूर गंभीर जखमी झाले.