पुसद - येथील पवार मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये अल्पवयीन मुलगी डेंग्यू झाल्यामुळे भरती झाली असता येथील कम्पाऊंडरने सलाईन लावली आणि पीडित मुलीची आई झोपल्यानंतर कम्पाऊंडरने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला..याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच दोन दिवस माहिती लपविल्याप्रकरणी डॉक्टरवरही गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना ता. २१ रोजी घडली.शहर पोलिस स्टेशन मध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी फरार असल्याचे ठाणेदार यांनी सांगितले. प्राप्त माहितीनुसार पवार मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये ता. १७ जुलै रोजी डेंग्यू झाल्यामुळे १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी भरती करण्यात आली. तिच्या सोबत आई सुध्दा होती..डब्बा आणण्यासाठी पीडित मुलीचे वडिल बाहेर गेले. तिचा ताप कमी होत नसल्यामुळे ताप कमी होण्यासाठी डोक्यावर पट्ट्या लावण्यात आल्या. परंतु ताप कमी न झाल्यामुळे आरोपी कम्पाऊंडर समशेर उर्फ समीर प्रकाश आडे (वय २१ रा. बोरनगर) याने प्रथम सलाईन लावली.यावेळी पीडित मुलीची आई सोबत होती. रात्री २ वाजता पीडित मुलीची आई झोपली. हे पाहुन आरोपी समीर आडे हा मुलीजवळ आला आणि तिच्या अंगावरील कपडे काढले आणि तिचा विनयभंग केला. पीडित मुलीला जाग आल्यानंतर तिने आरडाओरड केली..ता. १८ जुलै रोजी घटना झाल्यानंतरही आरोपी दवाखान्यातच होता. ता. २१ रोजी पीडित मुलीच्या वडिलाने शहर पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर ठाणेदार सेवानंद वानखेडे यांनी चौकशी सुरु केली. सीसीटिव्ही फुटेज तपासले. आरोपी विरोधात पोक्सो अंतर्गत कलम १०, २१ / २ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला..दरम्यान आरोपी सध्या फरार असुन त्याचा शोध घेणे सुरु आहे. दरम्यान, ही गंभीर घटना घडल्यानंतरही डॉ. तुषार उदेभान पवार वय ५५ वर्ष यांनी माहिती लपविली म्हणुन त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.