ज्याच्यावर होती पालन-पोषण करण्याची जबाबदारी, त्यानेच ओलांडली सीमा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

पीडित चिमुकलीची आई लहान असताना मरण पावली व वडील कामासाठी परगावी गेले असता तिच्या संगोपनाची जबाबदारी आजी-आजोबावर आली. पीडित मुलगी इयत्ता दुसरीत शिकत आहे. 5 फेब्रुवारी दुपारच्या सुमारास शाळेत जेवणाच्या सुट्टीमध्ये पीड़ित मुलीने उपाशी असल्याचे आपल्या शिक्षकांना सांगितले. तिला कारण विचारले असता तिने सर्व हकीकत वर्ग शिक्षकांना सांगितली.

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : लहानपणीच आईचे छत्र हरवले. वडील कामाच्या शोधात परगावी गेले. अशात आजी-आजोबांवर पालन-पोषण करण्याची जबाबदारी आली. मात्र, झाले भलतेच. वाचा ही कहाणी...

तालुक्यापासून आठ किमी अंतरावर असलेल्या कहाली येथे मनाला सुन्न करणारी ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. सख्ख्या आजोबानेच आपल्या नातीचे शोषण केल्याचा भयावह प्रकार पुढे आला आहे.

प्राप्त माहितीनुसार पीडित चिमुकलीची आई लहान असताना मरण पावली व वडील कामासाठी परगावी गेले असता तिच्या संगोपनाची जबाबदारी आजी-आजोबावर आली. पीडित मुलगी इयत्ता दुसरीत शिकत आहे.

सात वर्षीय चिमुकलीवर लौगिंक अत्याचार
5 फेब्रुवारी दुपारच्या सुमारास शाळेत जेवणाच्या सुट्टीमध्ये पीड़ित मुलीने उपाशी असल्याचे आपल्या शिक्षकांना सांगितले. तिला कारण विचारले असता तिने सर्व हकीकत वर्ग शिक्षकांना सांगितली. शिक्षकांनी तातडीने या घटनेची माहिती उपविभागीय अधिका-यांना दिली व रितसर ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली.

- महिला सुरक्षेच्या प्रश्नावर सरकारला साथ देण्यास तयार
 

सख्ख्या आजोबांनी केले लैंगिक अत्याचार
याप्रकरणी आरोपी सुधाकर पंढरी पिल्लारे (वय 60) याला अटक करण्यात आली. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर येथे पाठविण्यात आले. आरोपीला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रक्ताच्या नात्याला काळिमा फासणा-या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: minor girl molested by grandfather an chandrapur